"सव्यसाची होण्यासाठी मी उजवा हात कापून टाकायला तयार आहे."
"जेव्हा एक रस्ता दोन रस्त्यांमध्ये विभागतो, तेव्हा दुसराच घ्यावा."
"केवळ बघण्यातून तुम्ही प्रचंड निरीक्षण करू शकता."
"तिथे इतकी गर्दी आहे की, तिथे आता कुणीही जाऊ शकत नाही."
"मी जेव्हा विचाराधीन असते तेव्हा मी चित्त एकाग्र करू शकत नाही."
"पूर्वी जसा असायचा तसा भविष्यकाळ आता राहिलेला नाही."
"माझ्या मुलांना मी पुस्तकी ज्ञान देणार नाही. माझ्यासारखंच त्यांनाही अनुभवातून शिकू दे."
"आम्ही वाट हरवलोय, पण तरीही आम्ही त्याचा आनंद घेतो आहोत."
"माझ्याबद्दल ते पसरवत असलेल्या खोट्या वदंतांपैकी अर्ध्या ख-या नाहीत."
"निकेलला कवडीची पण किंमत नाहीये."
"हे एखाद्या देजा-वू अनुभवासारखंच आहे, पुन्हा पुन्हा घडणारं."
"जोपर्यंत हे संपूर्णपणे संपत नाही तोपर्यंत हे संपलंय असं मी म्हणणार नाही."
मिसेस लिंडसे: "तुम्ही खरंच "कूल" दिसताय." योगी बेरा: "धन्यवाद, पण तुम्ही काही तेवढ्या "हॉट" नाही दिसत आहात."
"जग जर परिपूर्ण असतं, तर ते तसं झालं नसतं."